Guest Lecturers Series : एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलमध्ये विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम

Guest Lecturers Series : एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलमध्ये विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम

Guest Lecturers Series एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलमध्ये विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम

सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश सिबीएसई स्कूल सेलू येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या संकल्पना आणि मार्गदर्शनात वर्ग नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयाच्या गेस्ट लेक्चर सिरीजचे आयोजन करण्यात आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना अतिरिक्त ज्ञान मिळावे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ५ ऑगस्ट सोमवार रोजी डॉ.सुधाकर चिताडे भौतिक शास्त्र विभागप्रमुख निवृत्त ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी यांच्या गेस्ट लेक्चरचे आयोजन करण्यात आले होते. या गेस्ट लेक्चर सिरीजमध्ये भौतिकशास्त्र विषयाचे डॉ.सुधाकर चिताडे यांनी ‘मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विज्ञान हा विषय थोडा अवघडच. त्यात जर भौतिकशास्त्र अभ्यासायचे म्हणजे किचकट होऊन जाते. हाच भौतिकशास्त्र विषय अगदी सोप्या भाषेत डॉ.चिताडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. सोबत स्पर्धा परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाचे महत्त्व सांगितले तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी, शंका समाधान केले. याप्रसंगी डॉ.संजय रोडगे यांनी डॉ. सुधाकर चिताडे यांचा सन्मान केला. डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, शाळेचे प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!