शाळेच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची : उपेंद्र बेल्लुरकर

शाळेच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची : उपेंद्र बेल्लुरकर

विवेकानंद प्राथमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना

सेलू : शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. या वेळी मार्गदर्शन करतांना स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर म्हणाले की, पालक शिक्षक संघाच्या माध्यमातून पालकांना शाळेची माहिती ,जाणीव व आपुलकी वाढून पालक शिक्षक संबंध दृढ होतात. पालकांच्या विविध संकल्पना,सूचना लक्षात घेऊन शाळेच्या गुणवत्तेच्या धोरणात बदल घडवीता येतात. याव्दारे विद्यार्थ्यांचे हीत जोपासले जाते. शालेय व्यवस्था, यंत्रणा व प्रक्रिया या बद्दल पालकांना माहिती मिळते. पालक व शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकार्यातूनच शाळेचा भौतिक विकास शक्य होतो.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी, शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी, मुख्याध्यापक शंकर शितोळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. हरिभाऊ चौधरी यांच्याकडून शाळेला ग्रंथ व पुस्तके भेट देण्यात आली. विद्यार्थी व पालक यांच्या साठी ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्राथमिक विभागाची माहिती रागिणी जकाते व उच्च प्राथमिक विभागाची विनोद मंडलिक यांनी माहिती दिली. प्राथमिक विभागात पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी अक्षदा कुलकर्णी, तर उच्च प्राथमिक विभागात पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी सीमा देशमुख यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणुनअर्चना होगे, संदीप हिरवे ,अनिता सोळंके, रुपाली सपकाळ, वसंतराव गोपेगावकर, गजानन वांबुरकर, रामकोर घनवट, महेश गौंडगे, बालासाहेब कानडे, अनिता वाघ, सुवर्णमाला इघारे, स्वाती गीते, रुपाली इघारे यांची निवड झाली. प्रास्ताविक शंकर शितोळे यांनी केले. सूत्रसंचालन विजय चौधरी ,पद्य दीपाली पवार यांनी सादर केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!