गटकळ अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे सैन्यदल भरतीमध्ये घवघवीत यश
सेलू जि.परभणी : छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या आर्मी भरतीमध्ये सेलू (जि.परभणी) येथील गटकळ करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. लेखी परीक्षेपाठोपाठ मैदानी चाचणीही यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अनिल संजय गायकवाड (वडी सारोळा), अर्जुन प्रकाश ढाकणे (रेणाखळी), वैजनाथ सोनाजी काळे (देहेगाव), उत्कर्ष शेषराव पुंडगे (भोगाव सावळे), विजय विठ्ठल कबाडी (नखाते हदगाव), भानुदास सुदाम खोसे (सायखेडा) यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना अकॅडमीचे संचालक रामेश्वर गटकळ, दीपक गटकळ आणि शिक्षक, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.