हर घर तिरंगा अभियान : मोटारसायकल रॅलीने सेलूमध्ये उत्साहाचे वातावरण
सेलू : सेलू तहसील कार्यालय आणि पंचायत समिती यांच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत बुधवारी, १४ ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ वाजता शिक्षक, महसूल, पोलिस कर्मचारी यांची मोटारसायकल रॅली व पदयात्रा उत्साहात झाली. यामुळे स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून ; तसेच तहसीलदार शिवाजी मगर, पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या उपस्थितीत हिरवी झंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समारोप झाला. याप्रसंगी मुख्याध्यापक संतोष पाटील, रविंद्र पाठक, रतन गोरे, थटवले, हर्षल टाक, रमेश मरेवार उपस्थित होते. समारोप प्रसंगी तहसीलदार शिवाजी मगर म्हणाले,” हर घर तिरंगा अभियानांतर्गत मोटारसायकल व पदयात्रेत शिक्षक व महसूल कर्मचाऱ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवून राष्ट्र भावना जागृत केली आहे.” याप्रसंगी किरण देशपांडे, नाईकनवरे, धनंजय भागवत, रोहिदास मोगल तसेच नगरपालिका कर्मचारी यांची उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे यांनी केले.