प्रॉस्परसस् पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात
विविध कार्यक्रमांचे आयोजन
सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचालित प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये गुरुवारी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका तथा प्राचार्या प्रगती क्षीरसागर, पालक प्रतिनिधी देशमुख व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, देशभक्तीपर गीत, नृत्य सादर केले. तसेच थोर समाजसुधारकांच्या वेशभूषा, मनोगत, असे विविध कार्यक्रम शाळेत घेण्यात आले.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला जवळजवळ दोन शतकांच्या ब्रिटीश वसाहतवादी राजवटीनंतर स्वातंत्र्य मिळाले. या दिवशी आपण स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. २०२४ मध्ये देश स्वातंत्र्याचे ७८ वे वर्ष साजरे करत आहे. आपले महान स्वातंत्र्यसैनिक महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, लाला लजपत राय, सरदार वल्लभभाई पटेल आणि लाल बहादूर शास्त्री इत्यादींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. त्यांच्या स्मृतिस स्वातंत्र्य दिनी अभिवादन केले जाते. या दिवशी राजधानी दिल्लीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशी माहिती यावेळी देण्यात आली. सूत्रसंचालन सारिका ताठे यांनी केले.