सेलूच्या नूतन विद्यालयाचा तन्मय भुतडा याचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव
सेलू जि.परभणी : इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत सेलू येथील नूतन विद्यालयाच्या तन्मय जयकिशन भुतडा याने राज्य गुणवत्ता यादीत १७ वे स्थान मिळविले. याबद्दल गुरुवारी, १५ ऑगस्टरोजी शासकीय ध्वजारोहणप्रसंगी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या वेळी पोलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, आमदार डॉ.राहुल पाटील, उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी, शिक्षणाधिकारी आशा गरूड तसेच मार्गदर्शक शिक्षक विरेश कडगे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.