शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जिंतूर येथे जाहीर सभा

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जिंतूर येथे जाहीर सभा

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जिंतूर येथे जाहीर सभा

मोठ्या संख्येने उपस्थित राहा : माजी आमदार विजय भांबळे यांचे आवाहन 

जिंतूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आयोजित शिवस्वराज्य यात्रा १७ ऑगष्टरोजी दुपारी तीन वाजता जिल्हा परिषद शाळा मैदान जिंतूर येथे होणार आहे. जिंतूर, सेलू तालुक्यातील नागरिकांनी शिवस्वराज्य यात्रेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार विजय भांबळे यांनी केले आहे. महाराष्ट्रातील सरकराला सामान्य नागरीकांविषयी काहीही देणे घेणे नाही. फक्त पक्ष फोडाफोडी व सत्तेसाठी हापापलेल्या सरकारने स्वाभिमान दिल्लीच्या ठिकाणी गहाण टाकला आहे. त्यासाठी जनतेच्या स्वाभिमानासाठी, जनतेच्या हितासाठी गोरगरीब नागरिकाच्या प्रश्नांसाठी, मुलभूत हक्कासाठी जनजागृती व्हावी, म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रा आयोजित केली आहे. या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, खासदार फोजिया खान माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, महेबूब शेख, जिल्हाध्यक्ष विजयराव गव्हाणे साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात्रेस जिंतूर-सेलू मतदार संघातील नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार विजय भांबळे यांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!