‘सुंदर माझी राखी’ स्पर्धेला प्रतिसाद

‘सुंदर माझी राखी’ स्पर्धेला प्रतिसाद

राखी पौर्णिमानिमित्त नूतन विद्यालयाचा उपक्रम 

सेलू : नूतन विद्यालय सेलू येथे शनिवार १७ ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने चित्रकला विभागातर्फे सुंदर माझी राखी स्पर्धा झाली. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धेत शाळेतील वर्ग पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनेने सुंदर राख्या तयार केल्या. मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक के.के. देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, गणेश माळवे आदींनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेसाठी कला शिक्षक आर.डी.कटारे, फुलसिंग गावीत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी शिल्पा बरडे, काशिनाथ पल्लेवाड, केशव डहाळे आदिनी पुढाकार घेतला. कर्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संतोष मालसटवाड यांनी तर आभार आर.डी.कटारे यांनी मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!