जैन वाचनालयाला राज्य सरकारचा पुरस्कार

जैन वाचनालयाला राज्य सरकारचा पुरस्कार

बोरीमध्ये बालवाचकांना पुस्तके वाटप करून आनंदोत्सव

परभणी : बोरी (ता.जिंतूर) येथील कै.जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयाला ‘क’ वर्ग ग्रामीण गटातून राज्य सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.‌ स्वातंत्र्य दिनानिमित्त ५० बालवाचकांना पुस्तके वाटप करून, पेढे भरवून पुरस्काराचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने २० ऑगस्ट रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. रोख पन्नास हजार रुपये, सन्मान चिन्ह सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती अध्यक्ष मीना जैन यांनी दिली. पुरस्काराच्या निमित्ताने गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण वाचनालयाला रंगीबेरंगी पताका, बलून लावून सजविण्यात आले. विद्युत रोषणाई करण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला‌. अध्यक्षस्थानी वाचनालयाच्या अध्यक्ष मीना जैन होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी, पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, अमृतराव चौधरी, एस.आर.कौटकर, संतोष चौधरी, सुभाषतात्या घोलप आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक दीपक राजुरकर, ग्रंथपाल नेमिनाथ जैन व अध्यक्ष मीना जैन यांचा सत्कार करण्यात आला. जैन वाचनालयाला जाहीर झालेला पुरस्काराने बोरीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, असे अजय चौधरी यांनी नमूद केले. यावेळी पवन ओझा, अनिल खिल्लारे, पियुष ओझा यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नेमिनाथ जैन यांनी केले. कांता सोमाणी, सुनीता सोनी, प्रतिभा ओझा, दैवशाला मजगे, बालप्रसाद सोमाणी, सूर्यप्रकाश सोनी, सात्विक बुलबुले आदींसह वाचक, विविध स्तरातील नागरिकांची उपस्थिती होती.

कोट …

मागील २५ वर्षांपासून वाचन चळवळ वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न वाचनालयाच्या विविध उपक्रमांद्वारे सुरू आहे. विशेषत: ग्रामीण वाचक आणि विद्यार्थ्यांत वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने सतत प्रयत्नशील आहोत. राज्य सरकारचा पुरस्कार बोरीकरांसाठी गौरवास्पद बाब आहे. – मीना नेमिनाथ जैन, अध्यक्ष, कै.जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालय, बोरी ( ता.जिंतूर)

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!