रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी

रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी

सेलूत मजलिसे ऐहरारच्या वतीने पोलिस प्रशासनाला निवेदन 

सेलू : दोन धर्मात तेढ निर्माण करुन द्बवेष पसरविणार्‍या रामगिरी महारांना तात्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन मजलिसे ऐहरारच्या वतीने सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दिपक बोरसे यांना देण्यात आले. नाशिक येथे प्रवचनादरम्यान सरला बेटचे रामगिरी महाराज यांनी मुस्लीम समाजाचे प्रेषित हाजरत मोहम्मद पैगंबर बदल व धार्मिक गूरूबद्दल अपशब्द वापरून खोटी माहिती सांगितली. यामुळे समस्त मुस्लीम समाजाच्या भावना दुखविल्या असून यामूळे सर्व मूस्लीम समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. कोणतही धर्म दुसर्‍या धर्माबदल टिका न करण्याचीच शिकवण देतो. परंतु काही लोक सध्या जाणून बूजून अशा प्रकारची भाषा वापरून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मुस्लीम समाजाचे पवित्र ग्रंथ (कुराण) व हाजरत पैगंबरबद्दल कोणत्याही प्रकारचे अपशब्द सहन करु शकत नाही.

शासनाने अशा प्रकारे दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या रामगिरी महाराजांना तात्काळ अटक करून या सारख्या बेताल भाषा व खोटी पोस्ट करणार्‍या लोकांवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्याचे मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर मजलिसे ऐहरारचे तालुकाध्यक्ष मोहम्मद याहिया खाॅन, हाफेज अमजद इशाती, सय्यद इम्रान हाशमी, मौलाना खाॅजा खासमी, मूफती अब्दुल अजिज मौलाना मूखतदिर, नगरसेवक शेख रहिम, रहिम पठाण, शफीकअली खाॅन, नईम पठाण, इरफानलाला,शेख इरशाद, सोहेल खाॅन, अब्दूल वाजीद, शेख जुबेरसह अनेकांच्या सह्या आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!