NCPSP : धिरज कदम यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
सेलू : परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी देऊळगाव गात येथील धिरज राजेभाऊ कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी आमदार विजय भांबळे आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र लहाने यांच्या हस्ते कदम यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी अशोकनाना काकडे, अप्पासाहेब डख, सुधाकर रोकडे, पप्पू गाडेकर, राजेभाऊ कदम, तुकाराम ताठे, बालाप्रसाद राठोड, अशोक पवार, धनंजय कदम, रामेश्वर हनवते आदींची उपस्थिती होती.
पक्षाचा विस्तार करुन पक्षाचे ध्येयधोरणे आणि देशाचे नेते शरदचंद्रजी पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न कराल पक्षाने आपल्याला दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडाल असा विस्वास व्यक्त करतो. जिल्हाध्यक्ष रितेश रावसाहेब काळे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. यावेळी युवक कार्यकर्ते उपस्थित होते.