मानवतच्या साईबाबा बँकेचा १० वा वर्धापन दिन उत्साहात

मानवतच्या साईबाबा बँकेचा १० वा वर्धापन दिन उत्साहात

परभणी : सेलू येथील साईबाबा नागरी बँकेच्या मानवत शाखेचा १० वा वर्धापन दिन सोमवारी, १९ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने ग्राहक, ठेवीदार तसेच मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर, मुख्यकार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे, संचालक इम्रान अहेमद व्यवस्थापक दत्तात्रय पौळ, व्यवस्थापक निसार पठान, सय्यद मुस्ताक रब्बानी उपस्थित होते.

या वेळी नव्याने रुजू झालेले मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांचा सत्कार करण्यात आला. माजी नगरसेवक दत्ता चौधरी, नियमात खान पठाण, किसन बारहाते, प्रकाशराव झोडगावकर, संतोष आंबेगावकर, मदन लाडाने, गोविंद होगे, बळीराम माने, मोहन कोकरे, डॉ.सचिन कदम, तुकाराम निर्वळ, सुधाकर मोरे, प्रताप लाडाने, शयाम कदम इरफान बागवान, आशिष मगर, मुश्ताक भाई तसेच ग्रामीण भागातील ग्राहक सभासदांची उपस्थिती होती. याचप्रमाणे बँकेचे ग्राहक, ठेवीदार, कर्जदार आदी कार्यक्रमास उपस्थित होते. बँकेच्या वाटचालीस शुभेच्छा देतांनाच बँकेच्या व्यवसाय पूर्तीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी बँकेच्या सुविधांचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा, शाखेला १० वर्षे पूर्ण होत आहेत. सभासद, ग्राहक यांनी दिलेल्या प्रतिसादबद्दल समाधान व्यक्त केले बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या बदलांबाबत तसेच डिजिटल बँकिंगबाबत चर्चा केली. बँकेमध्ये ग्राहकांच्या काही अडचण आहेत का ? बँकेच्या घोडदौडीबद्दल माहिती दिली. ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, आदी याेजना सेवा बँक एकाच छताखाली पुरविते. बँकेच्या विविध क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीबद्दल माहिती दिली. बँकेतर्फे किफायतशीर दरात कर्ज पुरवठा करण्याच्या योजनांची माहिती दिली. कर्यक्रम यशस्वी करण्यासाठी पासिंग ऑफिसर अमोल लाडाने, मगर अशोक, करवलकर हेमंत, अजित लाडाने, गोकुळ पारखे, गलबे संतोष, औटी दिगंबर, रायपल्लीवर माऊली, वैभव निर्वळ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सुरुवात साईबाबांच्या मूर्ती पूजनाने झाली. सुवर्णकार कपिल उदावन्त, प्रतिष्ठित व्यापारी उमेश बांगड, ऍड सुनील जाधव, मगर विठ्ठलराव, डॉ.अक्षय खडसे व सभासद उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!