कॅरम क्रीडा स्पर्धा : प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या मुलामुलींचे संघ सर्वप्रथम
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
सेलू : सेलू तालुकास्तरीय कॅरम क्रीडा स्पर्धेत एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या मधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या संघाने सर्वप्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड झाली आहे. १४ वर्षाखालील मुले संघात हर्ष डख, साई मगर, तसेच प्रेक्षा तमशेट्टी, ईश्वरी पौळ, रिद्धी करवा, सिद्धी साडेगावकर यांचा समावेश होता. १७ वर्षाखालील मुले संघात विजय खाडे, यश नवल, वीरेंद्र गजमल, वखार अन्सारी व मुलींमध्ये अनुष्का साबळे ,अनुष्का चव्हाण, अक्षरा लाटे यांचा समावेश होता. विजेत्यांचा श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, नारायण चौरे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.