सेलू तालुकास्तरीय कॅरम क्रीडा स्पर्धेत नूतन कन्या शाळेचे यश

सेलू तालुकास्तरीय कॅरम क्रीडा स्पर्धेत नूतन कन्या शाळेचे यश

*सेलू तालुकास्तरीय कॅरम क्रीडा स्पर्धेत नूतन कन्या शाळेचे यश*🔸जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड https://sakashnews.com/?p=12386 *S A K A S H N E W S* 🔻🔻🔻🔻🔻🔻 https://chat.whatsapp.com/LJxMVtWee746mMqv350A1e

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड 

सेलू : येथील श्रीमती ल.ला.रा.नूतन कन्या प्रशालेतील ९ विद्यार्थिनींची शालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वालूर येथील शांताबाई नखाते माध्यमिक विद्यालय या स्पर्धा झाल्या. प्रशालेच्या १५ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी ९ विद्यार्थिनींनी विजय प्राप्त केला. त्यांची परभणी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी खेळाडूंमध्ये सिद्धी पवार, गौरी उगले, अनुष्का शेडूते, भक्ती आघाव, स्नेहल कांबळे, श्रेया राऊत, सायली वैद्य, अक्षरा गायकवाड, दिपीका राठोड तसेच प्रशालेतील मार्गदर्शक क्रीडा यांचा समावेश आहे. क्रीडा शिक्षक किशोर ढोके, राजेश राठोड यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष

डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष श्री.डी.के.देशपांडे, चिटणीस प्राचार्य.डॉ.व्ही.के.कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती, मुख्याध्यापिका एन.डी.पाटील, उपमुख्याध्यापक डी.बी.घोगरे, पर्यवेक्षक, आर.एस.मोगल, के.एन.मलवडे, प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!