बोरीच्या जैन वाचनालयास डॉ.आंबेडकर पुरस्कार प्रदान

बोरीच्या जैन वाचनालयास डॉ.आंबेडकर पुरस्कार प्रदान

परभणी : बोरी येथील कै.जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयास महाराष्ट्र राज्य सरकारचा २०२२-२३ या वर्षीचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार २० ऑगस्ट रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. वाचनालयाच्या अध्यक्षा मीना जैन, सचिव बालाप्रसाद सोमाणी, उपाध्यक्ष पवन ओझा, प्रतिभा ओझा, अभिषेक जंबुरे व ग्रंथपाल नेमीनाथ जैन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई यांच्या वतीने दरवर्षी शहरी व ग्रामीण भागातील उत्कृष्ट वाचनालयाला पुरस्कार दिला जातो. ग्रामीण विभागातील ‘क’ वर्गातून पुरस्कार मिळविणारे बोरी येथील कै.जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालय हे मराठवाड्यातील एकमेव वाचनालय ठरले आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख ५० हजार रुपये सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे आहे. व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव प्रताप लुबाळ, जेष्ठ पत्रकार कुमार केतकर, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार यांची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!