राष्ट्रवादी शिक्षक सेल : परभणीत आज शिक्षक संवाद मेळावा

राष्ट्रवादी शिक्षक सेल : परभणीत आज शिक्षक संवाद मेळावा

खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती : माजी आमदार ॲड.विजय गव्हाणे, प्रा.किरण सोनटक्के यांची माहिती

sakashnews.com

परभणी : येथील जिंतूर रोडवरील अन्नपुर्णा लॉन्समध्ये रविवारी, २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक सेलतर्फे संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार ॲड.विजय गव्हाणे व आयोजक तथा राष्ट्रवादी शिक्षक सेलचे मराठवाडा अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांनी दिली. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार डॉ.फौजिया खान, शहर महिला जिल्हाध्यक्षा मनिषा केंद्रे आदींची उपस्थिती होती. या शिक्षक संवाद मेळाव्यास विशेष अतिथी म्हणून संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी खासदार डॉ.फौजिया खान, खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, माजी मंत्री आमदार राजेश टोपे, आमदार सुरेशराव वरपुडकर, माजी आमदार सीताराम घनदाट, जयप्रकाश दांडेगावकर, बाबाजानी दुर्राणी, विजयराव भांबळे, व्यंकटराव कदम, भीमराव हत्तीअंबीरे, जाकेर अहमद खान, बसवराज पाटील नागराळकर, राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश काळे, माजी आमदार तथा राष्ट्रवादी शिक्षक सेलचे राज्याध्यक्ष दिलीपराव सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष मनिषा केंद्रे, जुनी पेंशन योजनेचे राज्य सचिव गोविंद उगले, शहर जिल्हा कार्याध्यक्ष विकास लंगोटे आदींची उपस्थिती राहणार आहे. जास्तीत जास्त शिक्षक, शिक्षिकांनी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक तथा राष्ट्रवादी शिक्षक सेलचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!