विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी; आयुक्तांच्या पथकाकडून मतदान केंद्रांची पाहणी

विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी; आयुक्तांच्या पथकाकडून मतदान केंद्रांची पाहणी

सेलू जि.परभणी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या निर्देशानुसार आयुक्त कार्यालय, परभणी जिल्हा प्रशासन, महसूल व निवडणूक विभागाच्या पथकाने जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर सोमवारी, २६ ऑगस्ट रोजी भेट देऊन सोयीसुविधांची पाहणी केली. विभागीय आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी श्री अदमानकर, परभणीचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते यांनी सोमवारी सेलू तालुक्यातील मोरेगाव, चिकलठाणा बुद्रुक, निपाणी टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच सेलू शहरातील नूतन विद्यालयातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. मतदान केंद्रांवरील भौतिक सोयीसुविधा तसेच दिव्यांग मतदारांसाठी रॅम यासह निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सुविधांची पडताळणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी संगीता सानप, तहसीलदार शिवाजी मगर, एम.ए.आष्टीकर तसेच संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, केंद्रस्तरीय मतदान अधिकारी आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!