जिल्हास्तरीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत नूतन विद्यालयाचे वर्चस्व
सेलू : परभणी जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत विविध वयोगटात सेलू येथील नूतन विद्यालयाच्या मुलामुलींच्या संघांनी वर्चस्व राखले.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ऑगस्ट रोजी नूतन विद्यालयात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. उद्घाटक म्हणून मंत्रालयातील कक्ष अधिकारी अनंता साळवे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संतोष पाटील होते. उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक डी.डी.सोन्नेकर,क्रीडा अधिकारी सुयश नाटकर, माजी क्रीडा शिक्षक सतिश नावाडे,जिल्हा सचिव गणेश माळवे आदी उपस्थित होते. खेळा सोबत शिक्षणाची साथ आवश्यक आहे. यातून जीवन सफल होईल, असे प्रतिपादन अनंता साळवे यांनी यावेळी केले. प्रास्ताविक गणेश माळवे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.नागेश कान्हेकर, तर राजेश राठोड यांनी आभार मानले.
१४, १७ आणि १९ वर्ष वयोगटातील मुले व मुलींच्या गटात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. गंगाखेड, पूर्णा, परभणी, सेलू तालुक्यातील २८ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा अंतिम निकाल असा : १४ वर्षे मुले – प्रथम : नूतन विद्यालय सेलू, द्वितीय : बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल सेलू, तृतीय : बोर्डीकर पोदार इग्लिश स्कूल, सेलू, १४ वर्षे मुली – प्रथम : नूतन विद्यालय, द्वितीय : प्रिन्स इग्लिंश स्कूल, १७ वर्षे मुले – प्रथम नूतन विद्यालय सेलू, द्वित्तीय : बोर्डीकर पोदार इंग्लिश स्कूल सेलू, तृतीय: प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू, १७ वर्षे मुली – प्रथम : नूतन कन्या प्रशाला, सेलू, द्वितीय : संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड, १९ वर्षे मुले प्रथम : संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड, द्वितीय : नूतन महाविद्यालय, सेलू, १९ वर्षे मुली- प्रथम : संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड, द्वितीय : नूतन महाविद्यालय सेलू
स्पर्धा पंच प्रमुख चेतन मुक्तावार, पंच तुषार जाधव, सूरज भुजबळ, स्वप्निल आरसूळ, अनुराग आंमटी, यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक, संजय भुमकर, स्वप्निल चव्हाण, आनंद क्षीरसागर, सिध्देश्वर , सुरज शिंदे, गंगाधर आव्हाड आदींनी सहकार्य केले.