बाल विद्याविहार प्रशालेत रंगला दहीहंडी उत्सव

बाल विद्याविहार प्रशालेत रंगला दहीहंडी उत्सव

परभणी : बाल विद्या विहार’ शाळेत मंगळवारी (दि.27) गोपाळकाला निमित्ताने दहीहंडी व गोपाळकाला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक विनायक लोखंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.स्वाती कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वप्ना निर्मल यांनी कृष्ण जन्म कथा व श्रीकृष्णाच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. सई पवार या विद्यार्थिनींने भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावरील आधारित सुंदर गवळणीचे सादरीकरण केले. ‘गोविंदा रे गोपाळा’ या गीतासह अनेक वैविध्यपूर्ण गीताच्या सादरीकरणात दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी जवळपास 40 विद्यार्थ्यांनी राधा व श्री कृष्ण यांची वेशभूषा साकारली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या वर्गातील मुक्ता तांबोळी, आराध्या राऊत, गीता पामे तर आभार प्रणव आळसे यांनी मानले. विद्यार्थ्यांना गोपाळकाला व प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या वेळी शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!