ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या रायरेश्वर विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात 

ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या रायरेश्वर विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात 

परभणी : परभणी शहराजवळील धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवारी (२९ ऑगस्ट) हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता. याप्रसंगी संस्थाध्यक्ष तथा मुख्याध्यापक किरण सोनटक्के, सचिव शितल सोनटक्के, तसेच सर्व समन्वयक, विभाग प्रमुख, क्रीडाशिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत, त्यांच्या क्रीडा कौशल्याचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. यावेळी खेळामध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!