राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा शिक्षकांचा गौरव
सेलूतील जनसेवा नागरी पतसंस्थेचा उपक्रम
सेलू : येथील जनसेवा नागरी पतसंस्थेच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त गुरूवार, २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष सुधीरराव चौधरी, सचिव गणपतराव लहुरीकर, उपाध्यक्ष कवी गौतम सूर्यवंशी, संचालक प्रा.नागेश कान्हेकर, मोहन खापरखुंटीकर,नरेंद्र धानोरकर, शाखाधिकारी श्रीपाद चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जेष्ठ क्रीडा शिक्षक देविदास सोन्नेकर, सतीश नावाडे, प्रदीप कौसडीकर, प्रा.डॉ.के.के.कदम, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, संगीता खराबे, गणेश माळवे, प्रशांत नाईक, किशोर ढोके, सुभाष मोहकरे, अनिल कौसडीकर, रामेश्वर कदम, शेषराव नागरे, राजेश राठोड,रामा गायकवाड, सुरज शिंदे, प्रा. सुश्मीता भरदम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा.नागेश कान्हेकर, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, तर गणेश माळवे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे कर्मचारी गंगाधर वाघमारे, प्राची डासाळकर, विजय होलीया यांनी परिश्रम घेतले.