टेबल टेनिस स्पर्धेत बाल विद्याविहारचे यश

टेबल टेनिस स्पर्धेत बाल विद्याविहारचे यश

परभणी : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी यांच्या वतीने आयोजित परभणी जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात बाल विद्याविहार प्रशालेतील मुलींच्या संघाने यश मिळविले. संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली, तर मुलांचा संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघामध्ये अनुष्का मैड, मुक्ता तांबोळी, काव्या केंद्रकर, ज्ञानेश्वरी तळेकर, वेदिका नरगरे, स्वराज रेंगे, रुद्र टाक, सिद्धेश बुलबुले,मानव साळवे, पृथ्वीराज राऊत या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ.एन.ए.झरकर, सचिव डॉ.विवेक नावंदर, मुख्याध्यापक विनायक लोखंडे, विजयश्री कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी, क्रीडा शिक्षक आदित्य गायकवाड आदींनी अभिनंदन केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!