Teachers’ Day : एसबीआय बँकेतर्फे शिक्षकांचा सत्कार
सेलू : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिनानिमित्त सेलू येथील भारतीय स्टेट बँकेच्या वतीने नूतन विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुरुवारी (ता.५) यथोचित सत्कार करण्यात आला. शाखा व्यवस्थापक अनंत घावडे, प्रवीण जायभाय, रवि घनसावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मुख्याध्यापक एस.व्ही.पाटील, किरण देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पी.टी.कपाटे, गणेश माळवे, अशोक लिंबेकर, बाबासाहेब हेलसकर, बन्सीलाल पद्मावत, सुधीर जोशी, आर.एस.सोनवणे, सुनीता सांगुळे, अर्चना कुलकर्णी, अनुजा सुभेदार, आर.डी.कटारे, भगवान देवकते, व्यंकट तोरणाळे, संतोष क्षीरसागर, विशाल क्षीरसागर, विजेंद्र धापसे, सुनील तोडकर, डॉ.काशिनाथ पल्लेवाड, सुरेश हिवाळे, विरेश कडगे आदींसह शिक्षकांची उपस्थिती होती.