National Highway 548 B : इंजेगाव-देवगावफाटा रस्ते कामास ७६१ कोटी मंजूर

National Highway 548 B : इंजेगाव-देवगावफाटा रस्ते कामास ७६१ कोटी मंजूर

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर यांनी घेतली भेट

सोनपेठ : मराठवाडा विदर्भासह अन्य राज्यांना जोडणारासोनपेठ तालुक्यातून जाणार्‍या ईजेगाव-सोनपेठ-पाथरी-देवगावफाटा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना केंद्र सरकारने 761 कोटी 81 लक्ष मंजूर केले असून 15 सप्टेंबर रोजी या कामांच्या निविदा निघणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.06) गडकरी यांची नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली.
या भेटीतून जिल्ह्यांतर्गत महामार्ग व राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसंदर्भात तपशीलवार चर्चा केली. त्यावेळी गडकरी यांनी इंजेगाव ते देवगाव फाटा या महामार्गाच्या कामास तरतुद मंजूर करण्यात आली असून या कामाच्या निविदासुध्दा 15 सप्टेंबर रोजी निघणार आहेत, हे स्पष्ट केले. यावेळी या 548-बी क्रमांकाच्या रस्त्याच्या रखडलेल्या कामांबद्दल या दोघा आमदार महोदयांसह शिष्टमंडळाने खंत व्यक्त करीत हे काम सुरु करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याचवेळी गडकरी यांनी क्षणार्धात ही माहिती दिली.

भूमीपूजनाचे निमंत्रण गडकरी यांनी स्वीकारले

यावेळी आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, माजी उपनगराध्यक्ष राम वांकर कृउबा संचालक अमर वडकर, माजी नगरसेवक विनोद चिमनगुंडे, राम नवले, घनश्याम सारडा, शामसुंदर पांपटवार, विष्णू चव्हाण, भगवान मोहिते यांची उपस्थिती होती. या शिष्टमंडळाने या कामाच्या भूमीपूजन सोहळ्यास आपण स्वतः उपस्थित रहावे, अशी मागणी गडकरी यांच्याकडे केली. त्यावेळी त्यांनी हे निमंत्रण स्विकारले. ऑक्टोंबर महिना अखेर आपण येवू, असे आश्‍वासन दिले. दरम्यान, हा महामार्ग पूर्ण झाल्यास मराठवाडा विदर्भासह अन्य राज्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे.

1 हजार 162 कोटींच्या रुपयांच्या कामांना मंजुरी : गंगाखेड तालुक्यातील 36 कोटी रुपये खर्चाच्या गंगाखेड – धारखेड गोदावरी नदी वरील पुल व त्याखालील बंधार्‍याचे बांधकामाचे लोकार्पण, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 के गंगाखेड -इसाद-खोकले वाडी -पिंपलदरी मार्गे किनगाव या 33 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण व दुहेरीकरणाच्या कामास 1 हजार 162 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दिली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!