श्रीराम प्रतिष्ठानच्या शिक्षक पुरस्कारांनी अशोक कुंभार, जावेदखान, कपिल भरणे यांचा सन्मान
विविध पुरस्कारांनी २८ शिक्षकांचा सेलूमध्ये गौरव
सेलू जि.परभणी : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने २८ प्राथमिक, पूर्वप्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकांना परभणी जिल्हा आदर्श शिक्षक, उपक्रमशील आणि नाविन्यपूर्ण शिक्षक पुरस्काराने शुक्रवारी, ६ सप्टेंबर रोजी गौरविण्यात आले.
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती आणि शिक्षकदिनाच्या निमित्ताने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे होते. याप्रसंगी सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ.ऋतुराज साडेगावकर डॉ.राजेंद्र गात, नारायण पाटील, दिलीप डासाळकर, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी परभणी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने वाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अशोक कुंभार यांना, उपक्रमशील शिक्षक पुरस्कार यासेर उर्दू प्राथमिक शाळेचे जावेदखान पठाण, तर नाविण्यपूर्ण शिक्षक पुरस्काराने ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे कपिल भरणे यांना डॉ.संजय रोडगे, डॉ.सविता रोडगे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रास्ताविक प्रा.अशोक बोडखे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप आकात, कल्पना भाबट यांनी केले. आभार दिगंबर टाके यांनी मानले.
श्रीराम प्रतिष्ठानअंतर्गत घटक संस्थांतील पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे याप्रमाणे : एलकेआरआर प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल – अर्जून गरूड, नारायण चौरे, ममता दास, आशा गायकवाड, श्याम देशमुख, कल्पना भाबट, राहुल साह, क्युरिअस किड्स – अंजली कलाडिया, प्राॅस्पेरस पब्लिक स्कूल – सपना दगडु, दीपा सावंत, सारिका ताठे, फीन किड्स – धनश्री हुगे, ज्ञानतीर्थ विद्यालय – इंद्रजित मोरे, सुचिता साबळे, लक्ष्मीकांत खरात, अश्विनी जुमडे, संदीप आकात , जिज्ञासा बालविहार – नेहा देशमुख, उत्कर्ष विद्यालय- पूनम आतकरे, वैशाली परळीकर, शिवानंद हाके, अपूर्वा पाॅलिटेक्नीक – प्रा.गौतम इंगोले, प्रा.वाघ श्याम, डॉ.राम रोडगे अध्यापक महाविद्यालय – डॉ.बबन सोनवणे, आदित्य अध्यापक विद्यालय – प्रा.गणेश सोनार