डॉ.सुरेश हिवाळे यांना विद्यावाचस्पती पदवी
सेलू /परभणी : येथील नूतन विद्यालयातील मराठी विषय शिक्षक डॉ.सुरेश हिवाळे यांना मानव्य विद्याशाखे अंतर्गत राज्यशास्त्र विषयात ‘हैदराबाद मुक्ती संग्रामात मराठवाड्यातील पाच प्रमुख शिक्षण संस्थांचे योगदान – एक अभ्यास ‘ या शोध प्रबंधासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विद्यावाचस्पती पदवी शुक्रवारी, ६ सप्टेंबर रोजी जाहीर झाली आहे. श्री.हिवाळे यांनी सेलू येथील नूतन महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी आणि सहमार्गदर्शक नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड येथील उपप्राचार्य डॉ.कल्पना कदम यांच्या मार्गदर्शनात आपले संशोधन पूर्ण करुन विद्यापीठाला सादर केले. ते प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांचे १६ वे संशोधक विद्यार्थी आहेत. डॉ.सुरेश हिवाळे यांना विद्यावाचस्पती पदवी जाहीर झाल्याबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया, उपाध्यक्ष डी.के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रसिद्ध साहित्यिक डॉ.आसाराम लोमटे, प्रा. भगवान काळे, डॉ.भालचंद्र धर्मापुरीकर, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, त्र्यंबक वडसकर, माणिक पुरी, मारूती डोईफोडे, डॉ.सखाराम कदम, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, डॉ.शरद ठाकर, बबनराव आव्हाड, प्रा. नागेश कान्हेकर, परसराम कपाटे, विजेंद्र धापसे, मुरलीधर डाके, कृष्णा कानडे, बाळू बुधवंत यांच्यासह विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.