एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
सेलू : परभणी येथे महाराष्ट्र अथॅलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या परभणी जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी मैदानी स्पर्धेमध्ये एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलचा विद्यार्थी मुकेश बेटेकर १६ वर्षांखालील गटात भालाफेक मध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावले, मनीषा धनवे १८ वर्ष खालील गटात थाळी फेकमध्ये प्रथम मिळवून सुवर्ण पदक पटकावले आणि मनीष दहिकर १४ वर्षांखालील गटात उंच उडी प्रकारात दुसरा क्रमांकमिळवून कास्य पदक पटकवत पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय फेरी साठी पात्र ठरले आहेत. मार्गदर्शक शिक्षक प्रा.शिवाजी बुधवंत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर अभिनंदन केले आहे.