श्रीगणेशोत्सव : श्री गणरायांचे जल्लोषात स्वागत 

श्रीगणेशोत्सव : श्री गणरायांचे जल्लोषात स्वागत 

सेलू शहरासह ग्रामीण भागात उत्साह

सेलू/परभणी : ” गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” च्या जयघोषामध्ये परभणी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात गणरायांचे शनिवारी (६ सप्टेंबर) जल्लोषात स्वागत करण्यात आले. गणेश मंडळांनी दुपारपासूनच श्री गणेश मूर्तींची वाजत गाजत प्रतिष्ठापना केली. सेलू शहरातील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात श्री गणेश मूर्ती घेऊन जाण्यासाठी सायंकाळीपर्यंत उत्साह दिसून आला. गणेशोत्सव काळात शहर व ग्रामीण भागातील गणेश मंडळांच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. शहरी भागात विविध कार्यक्रमांसह मोठ-मोठ्या देखाव्यांवर भर देण्यात आला आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!