‘श्रीगणेश लिला’ पाहण्यासाठी सेलूकरांची गर्दी

‘श्रीगणेश लिला’ पाहण्यासाठी सेलूकरांची गर्दी

आदर्श व्यापारी गणेश मंडळाने जपली ६० वर्षांची देखाव्यांची परंपरा

'श्रीगणेश लिला' पाहण्यासाठी सेलूकरांची गर्दी

परभणी/सेलू : सेलू येथील मोंढा भागातील श्री आदर्श व्यापारी गणेश मंडळाने गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांसह देखाव्यांची परंपरा ६० व्या वर्षीही जपली आहे. या वर्षी मंडळाने  “श्री गणेश लिला” हा भव्य हलता देखावा साकारला आहे. देखावा पाहाण्यासाठी सेलूकरांनी गर्दी केली आहे. १९६४ साली या मंडळाची स्थापना झाली. स्व.कमल लोया, स्व.इलेश पटेल, स्व.अमरिकसिंग बब्बर आदींसह व्यापाऱ्यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक, पौराणिक सजीव देखाव्यांव्दारे मनोरंजन आणि लोकप्रबोधनाची चळवळ मंडळाने सुरू केली. ज्वलंत सामाजिक विषयावर प्रबोधन, उपक्रम, स्पर्धांचे आयोजन केले जाते. अध्यक्ष चंद्रप्रकाश सांगतानी, प्रभुदयाल मंत्री, प्रथमेश राठी, आनंद मालाणी, संजय परताणी, रामवल्लभ राठी, अशोक मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली अनुप काबरा, सुनील सोमाणी, भागवत पाटील, नीलेश गौरी, शैलेश भराडिया, अजय सराफ, नारायण शर्मा, शितलकुमार गंगवाल, धीरज मंत्री, वरूण भुतडा, कृष्णा बहिवाल, पंकज परदेसी, अभिजित बोराडे, विनीत मालाणी, राजदीप रोडगे, पुनीत गुरबानी, अर्पण मंत्री, आरुष राठी, केशव कासट, सगीरभाई आदी परिश्रम घेत आहेत. मंडळाच्या कार्यात सध्या तिसरी पिढी आहे. विविध कार्यक्रमांत माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, प्रभाकर सुरवसे, राजेंद्र झोडगावकर तसेच सर्व व्यापारी मंडळाचे सहकार्य लाभते, असे बाळूशेठ मंत्री यांनी सांगितले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!