स्व.दत्तात्रय हेलसकर स्मृतीदिन : लिंबेवडगाव, सातोना शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
मंठा : हेलस येथील अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखेचे संस्थापक स्वर्गीय दत्तात्रय हेलसकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लिंबे वडगाव (ता.मंठा जि.जालना) येथील सर्व मुलांना मंगळवारी, ९ सप्टेंबररोजी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साने गुरुजी कथामालाचे सदस्य प्रमोद देशमुख, भगवानराव खरात, संदीप जाधव, मुख्याध्यापक दत्तात्रय राऊतवाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परमेश्वर पांढरे, रामेश्वर दासरवाड, अच्युत बुधवंत, संजय भवर, राठोड उपस्थित होते. दरम्यान स्व.दत्तात्रय हेलसकर यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातोना बुद्रुक येथे वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक डी.के.जाधव, विजय वायाळ, सतीश कुलकर्णी, संजय खरात, शेवाळे, बिडवे आदींची उपस्थिती होती