प्रिन्स इंग्लिश स्कूल गणेश मंडळाकडून गरजूंना मदतीचा हात

प्रिन्स इंग्लिश स्कूल गणेश मंडळाकडून गरजूंना मदतीचा हात

प्रेरणादायी सामाजिक उपक्रमाचे विविध स्तरातूून कौतुक

सेलू, दि.१० : गणेशोत्सवाच्या आनंदमयी सणात, श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल गणेश मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत, गरजूंना मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. सणासुदीचे औचित्य साधून गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. या उपक्रमामध्ये बिस्कीट, पाणी बॉटल,अन्नधान्य, कपडे, शालेय साहित्य आणि आरोग्य सेवा यांचा समावेश होता. शाळेतील विद्यार्थ्यांनी सेलू येथील बसस्थानक, उपजिल्हा रुग्णालय, रेल्वे स्टेशन येथील गरजू लोकांची मदत केली. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी या सामाजिक उपक्रमा विषयी माहिती देताना सांगितले की, “गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून, समाजसेवा करण्याची संधी आहे.” या उपक्रमातून गरजू लोकांना नक्कीच लाभ झाला असून, मंडळाने यापुढेही अशा प्रकारे मदत सुरू ठेवण्याचे वचन दिले आहे. गणेश मंडळाच्या या प्रेरणादायी सामाजिक कार्याचे शहरातील विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

सेलूतील श्रीबाळगोपाळ गणेश मंडळाला ८३ वर्षांची परंपरा

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!