अक्षय बाहेती यांना पीएचडी

अक्षय बाहेती यांना पीएचडी

सेलू जि.परभणी : सेलू येथील अक्षय सतीश बाहेती यांना आयआयटी दिल्ली व युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड, आस्ट्रेलिया यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच पीएचडी प्रदान करण्यात आली. ‘भूकंप आणि आगअंतर्गत काँक्रीट संरचनांचे जोखीम मूल्यांकन’ या विषयात बाहेती यांनी शोधनिबंध पूर्ण केला आहे. डॉ.अक्षय हे सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थीआहेत. सध्या ते पुढील संशोधनासाठी जपान टोयोहासी विद्यापीठात दाखल झाले आहेत. यासाठी जपान येथील सुझुकी फाऊंडेशनचे आर्थिकसाहाय्य त्यांना प्राप्त झाले आहे. या यशाबद्दल याबद्दल सेलू तालुका  माहेश्वरी सभा, जयराड मित्रमंडळ यांच्या वतीने डॉ.अक्षय यांचा सत्कार करण्यात आला.विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सेलूतील श्रीबाळगोपाळ गणेश मंडळाला ८३ वर्षांची परंपरा

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!