सेलूतील श्रीबाळगोपाळ गणेश मंडळाला ८३ वर्षांची परंपरा
सेलू : सेलू जि.परभणी शहरातील नावाडे गल्लीतील श्री बाळ गोपाळ गणेश मंडळांला ८३ वर्षांचा उज्ज्वल परंपरा लाभली आहे. १९४१ मध्ये या गणेश मंडळाची स्थापना झाली होती. स्थापनेचे हे ८४ वे असून आजही माळवदाच्या घरात श्री गणेशमूर्तीची स्थापना करण्याची परंपरा जपली गेली आहे. गल्लीतील सर्व समाज बांधव विविध कार्यक्रमांसाठी परिश्रम घेतात. स्थापनेपासूनच विविध सामाजिक विषयांवर तसेच पौराणिक सजीव देखावे सादर करण्याची मंडळाला परंपरा आहे. या वर्षी पहिली ते बाराव्या विद्यार्थ्यांना चंद्रशेखर नावाडे, अभिजित राजूरकर, सतीश नावाडे, चैतन्य नावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लेझीम प्रशिक्षण देण्यात येत आहेत. तसेच विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महिला व युवतींचा सहभाग मोठा आहे. अध्यक्ष सर्वेश नावाडे, अनुज नावाडे, अंश नावाडे, संस्कार नावाडे, मयांक नावाडे आणि पदाधिकारी, सदस्य कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.