श्रीरामबाग गणेश मंडळाचा देखावा लक्षवेधी
सेलूतील गणेशभक्तांची गर्दी, प्रसाद देणाऱ्या मोराचेही आकर्षण
सेलू : गणेशोत्सवानिमित्त सेलू (जि.परभणी) शहरासह ग्रामीण भागात गणेश मंडळांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला असून, या वर्षी सेलू येथील मारवाडी गल्लीतील श्री रामबाग (रामवाडा) गणेश मंडळाने साकारलेला ” श्री गणेश व श्री कार्तिकेय यांच्या बुद्धी व चातुर्याची परीक्षा” हा भव्य स्वयंचलित देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची सायंकाळी गर्दी होत आहे. रामबाग (रामवाडा) गणेश मंडळाचे हे ६२ वे वर्ष आहे. मंडळाला पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक सजीव देखाव्यांची परंपरा लाभलेली आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून रामबाग मंडळाचे श्री केदारनाथ धाम, ३१ फुटी शिवलिंग आदी देखाव्यांनी लक्ष वेधले होते. या वर्षी “श्री गणेश व श्री कार्तिकेय यांच्या बुद्धी व चातुर्याची परीक्षा” तीस फुट उंच, ५० फूट लांब आणि ३५ रूंद हा स्वयंचलित देखावा तसेच आठ फूट उंच आणि बारा फूट लांबीचा पिसारा फुलवून प्रसाद देणारा मोर गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. गणेश भक्तांना झाडाचे रोप, प्रसाद वाटप, भजन संध्या, महिला व मुलामुलींसाठी विविध सांस्कृतिक स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. श्री बालाजी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य तसेच सूर्यकांत जाधव , प्रदीप बाहेती, अविनाश बिहाणी, संजय लोया, रामविलास तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष श्रेयस परताणी, उपाध्यक्ष श्रवण काबरा, कोषाध्यक्ष रजत मंत्री, सचिव रोहित दाड, सल्लागार गौरव बिहाणी, सागर लोया, अमित बरलोटा, स्वप्नील मणियार, चेतन लोया, दीपक कर्वा, ऋषीकेश झमकडे, गौरव तिवारी आदींसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत.