श्री बालाजी गणेश मंडळाचे ५१ वे वर्ष

श्री बालाजी गणेश मंडळाचे ५१ वे वर्ष

विविध सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रमांवर भऱ

परभणी /सेलू : मारवाडी गल्ली चौकातील श्री बालाजी गणेश मंडळाचे ५१ वे वर्ष आहे. अध्यक्ष शाम फुलबाटी, विश्वास राजवाडकर, विश्वनाथ हुगे, राधा किशन मिश्रा, सतीश तिवारी, परमेश्वर कदम, रितेश लोया आदींच्या पुढाकाराने उपक्रम राबविले जात आहेत. दरम्यान, सेलूतील विविध भागातील गणेशमंडळांनी सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला आहे. तसेच अनंत चतुर्दशीला अन्नदानाची परंपरा जपण्याचेही नियोजन केले आहे.

येथील मठगल्लीतील श्री संत गोविंदबाबा गणेश मंडळाने ४२ व्यावर्षीही बारा फुटी वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. यावर्षी महादेव-गणेश रूपातील मूर्ती आहे. गरजूंना ब्लकेंट, शालेय साहित्य वाटप, सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन केले जाते. अन्नदानाची मोठी परपंरा आहे. विशेष म्हणजे उर्वरित वर्गणीतून संत गोविंदबाबा मंदिरातील विविध विकास कामे केली जातात. मंडळाच्या कार्यात सूर्यकांत जाधव , कपिल पडूळ, शक्ती बोराडे, राजेश उपाध्ये, गणेश निवळकर, शिवप्रसाद काबरा, बाबासाहेब डांगे, गोविंद शेलार यांच्या मागर्दर्शनाखाली अध्यक्ष नितीन शेलार, उपाध्यक्ष विजय पवार, कोषाध्यक्ष अशोक शेलार, रामेश्वर साबळे, गजानन शेलार, रामा मुळे, अजय पवार, भागवत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते परिश्रम घेतात. नावाडे गल्लीतील श्री बाळ गोपाळ गणेश मंडळाने ८३ व्यावर्षीही माळवदाच्या घरात श्री गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. उपक्रमांची परंपरा जपली आहे. चंद्रशेखर नावाडे, अभिजित राजूरकर, सतीश नावाडे, चैतन्य नावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना लेझीम प्रशिक्षण देण्यात येत आहेत. अध्यक्ष सर्वेश नावाडे, अनुज नावाडे, अंश नावाडे आदी परिश्रम घेत आहेत. मारवाडी गल्ली चौकातील श्री बालाजी गणेश मंडळाचे ५१ वे वर्ष आहे. अध्यक्ष शाम फुलबाटी, विश्वास राजवाडकर, विश्वनाथ हुगे, राधा किशन मिश्रा, सतीश तिवारी, परमेश्वर कदम, रितेश लोया आदींच्या पुढाकाराने उपक्रम राबविले जात आहेत. दरम्यान, सेलूतील विविध भागातील गणेशमंडळांनी सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला आहे. तसेच अनंत चतुर्दशीला अन्नदानाची परंपरा जपण्याचेही नियोजन केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!