महाराजा गणेश मंडळाकडून विविध कार्यक्रम

महाराजा गणेश मंडळाकडून विविध कार्यक्रम

सेलूतील विविध मंडळाचे सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य

परभणी /सेलू : सेलूतील विविध भागातील गणेशमंडळांनी सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला आहे. तसेच अनंत चतुर्दशीला अन्नदानाची परंपरा जपण्याचेही नियोजन केले आहे.शिवतीर्थ परिसरात महाराजा गणेश मंडळाने भव्य गणेश मूर्तीसह महाकाल, प्रभु श्रीरामची देखावा साकारला आहे. अध्यक्ष नवनाथ खांडेकर, रुतीक राऊत, श्रीकांत झुटे, शुभम शेडुते, अमोल खुळे, अक्षय साळवे, भारत शिंदे, गजानन सोनवणे, चंदू काठोळे, राहुल गायकवाड, बाळू हेलकुटे आदी पुढाकार घेत आहेत. 

सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांवर भर

विद्यानगर भागातील श्री कालिका गणेश मंडळाचे हे २७ वे वर्ष आहे. गणेशोत्सव काळात विविध स्पर्धांसह सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला जातो. दररोज सायंकाळी सामुदायिक महाआरती, भजन संध्या होते. महिला व कासार समाज बांधवांची मोठी उपस्थिती असते. अध्यक्ष अशोक कासार, अशोक वानरे, गजानन हेलसकर, सुनीता हेलसकर, प्रभाकर खरावणे, रामप्रसाद वराड, गोपाळराव सासवडे, जीवन खरावणे, अनंत विश्वांभर, पुजारी अरूण ढोके आदींची पुढाकार असतो.सेलू शहरातील नावाडे गल्लीतील श्री बाळ गोपाळ गणेश मंडळांच्या स्थापनेचे हे ८३ वे असून आजही माळवदाच्या घरात श्री गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. या वर्षी शालेय विद्यार्थ्यांना चंद्रशेखर नावाडे, अभिजित राजूरकर, सतीश नावाडे, चैतन्य नावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लेझीम प्रशिक्षण देण्यात येत आहेत. अध्यक्ष सर्वेश नावाडे, अनुज नावाडे, अंश नावाडे आदी परिश्रम घेत आहेत. मारवाडी गल्ली चौकातील श्री बालाजी गणेश मंडळाचे स्थापनेचे ५१ वे वर्ष आहे. विविध कार्यक्रमासाठी अध्यक्ष शाम फुलबाटी, उपाध्यक्ष विश्वास राजवाडकर, सचिव विश्वनाथ हुगे, सहसचिव राधा किशन मिश्रा, सतीश तिवारी, परमेश्वर कदम, रितेश लोया आदींसह कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. शिवतीर्थ परिसरात महाराजा गणेश मंडळाे भव्य गणेश मूर्तीसह महाकाल, प्रभु श्रीरामची देखावा साकारला आहे. अध्यक्ष नवनाथ खांडेकर, रुतीक राऊत, श्रीकांत झुटे, शुभम शेडुते, अमोल खुळे, अक्षय साळवे, भारत शिंदे, गजानन सोनवणे, चंदू काठोळे, राहुल गायकवाड, बाळू हेलकुटे आदी पुढाकार घेत आहेत. विद्यानगर भागातील श्री कालिका गणेश मंडळाचे हे २७ वे वर्ष आहे. गणेशोत्सव काळात विविध स्पर्धांसह सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला जातो. दररोज सायंकाळी सामुदायिक महाआरती, भजन संध्या होते. महिला व कासार समाज बांधवांची मोठी उपस्थिती असते. अध्यक्ष अशोक कासार, अशोक वानरे, गजानन हेलसकर, सुनीता हेलसकर, प्रभाकर खरावणे, रामप्रसाद वराड, गोपाळराव सासवडे, जीवन खरावणे, अनंत विश्वांभर, पुजारी अरूण ढोके आदींची पुढाकार असतो.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!