रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये अत्याधुनिक रोबोटिक हबचे थाटात उद्घाटन

रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये अत्याधुनिक रोबोटिक हबचे थाटात उद्घाटन

सेलू/ परभणी : परभणी जिल्ह्यातील नामांकित शाळांपैकी एक असलेल्या सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलमध्ये शुक्रवारी, १३ सप्टेंबर रोजी रोबोटीक जिनियस हबचे उद्घाटन परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सदानंद भिसे यांच्या हस्ते थाटात पार पडले. या वेळी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महिला रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.सदानंद मोरे, डॉ.गणेश पारवे, डॉ.ऋतुराज साडेगावकर, डॉ. अपूर्वा रोडगे-पारवे, मिलिंद पवार, सतीश करवा, वीरू पौळ, मगर, काकडे, प्रा.महादेव साबळे,‌ प्रा.कार्तिक रत्नाला, प्रा.प्रगती क्षीरसागर आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. या वेळी मार्गदर्शन करतांनी डॉ.सदानंद भिसे म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी ही रोबोटीक लॅब तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची संधी ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून मिळणार आहे. लॅबमध्ये अत्याधुनिक उपकरणे, रोबोटिक्स किट्स आणि संगणक प्रणाली यांचा समावेश आहे. लॅब सुरू केल्याबद्दल आनंद व्यक्त करीत, विद्यार्थ्यांना या लॅबच्या माध्यमातून संशोधनाची संधी मिळेल. त्याचा फायदा घ्यावा. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध रोबोटिक प्रकल्पांचे सादरीकरण करीत भरभरून दाद मिळविली.

डॉ.सदानंद मोरे म्हणाले की, विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची संधी आपण देत आहोत. आधुनिक शिक्षणात केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे नाही. तर प्रत्यक्ष अनुभव घेणेही तितकेच आवश्यक आहे. या रोबोटिक लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचे प्रत्यक्ष अनुभव घेता येतील. डॉ.साडेगावकर म्हणाले की, ही लॅब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात मोठे योगदान देणारी ठरणार आहे. डॉ. संजय रोडगे म्हणाले, “ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ठसा उमठवण्यासाठी या रोबोटीक लॅबमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. केवळ पुस्तकी ज्ञानावर न थांबता, प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि प्रयोगशीलता यशाकडे नेईल. भविष्यातील उद्योग व क्षेत्रांमध्ये रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि स्वयंचलित प्रणालींचे महत्त्व अधिक वाढणार आहे. अशा परिस्थितीत आपल्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रांमध्ये कौशल्य आत्मसात केले पाहिजे. यासाठीच रोबोटिक लॅबची निर्मिती करण्यात आली आहे. याव्दारे नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल. या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्या प्रा.प्रगती क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन कल्पना भाबट, तर प्राचार्य कार्तिक रत्नाला यांनी आभार मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!