श्रीराम कथा : १५ ऑक्टोबरपासून सेलूमध्ये श्रीराम कथा

श्रीराम कथा : १५ ऑक्टोबरपासून सेलूमध्ये श्रीराम कथा

राष्ट्रसंत स्वामी गोविन्ददेवगिरिजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून…

श्रीराम कथा : १५ ऑक्टोबरपासून सेलूमध्ये श्रीराम कथा

सेलू/परभणी : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत परमपूज्य स्वामी गोविन्ददेवगिरिजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून सेलू येथे १५ ते २३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत श्रीराम कथा आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मंगळवारी, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता श्रीकेशवराज बाबासाहेब मंदीर ते श्रीबालाजी मंदीरपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. मंगळवारी, १५ ऑक्टोबर ते बुधवारी, २३ ऑक्टोबर या कालावधीत दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत श्रीराम कथा (मराठीतून) होईल. कथास्थळ ‘हनुमानगढ’ नूतन विद्यालयामागील क्रीडांगण सेलू,जि.परभणी (महाराष्ट्र) आहे. दरम्यान, सोमवारी, २१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता श्रद्धेय गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भजनसंध्या आहे. कथा श्रवणासाठी इष्टमित्र परिवारासह अगत्यपूर्व उपस्थित राहावे, असे आवाहन जयप्रकाश बिहाणी, विजयकुमार बिहाणी आणि बिहाणी परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!