निम्नदुधना : दोन दरवाजातून नदीपात्रात पाणी सोडले

निम्नदुधना : दोन दरवाजातून नदीपात्रात पाणी सोडले

२०२० क्युसेक दराने नदीपात्रात विसर्ग सुरू 

सेलू/परभणी : सेलू (जि.परभणी) तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्नदुधना धरणाचे दोन दरवाजे गुरुवारी, १९ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता ०.३० मीटरने उघडून २०२० क्युसेक दराने विसर्ग दुधना नदीपात्रात करण्यात येत आहे. धरणाची जलाशय पाणीपातळी ४२५.२१० मीटरवर पोहोचली आहे. सद्यस्थितीत धरणात जीवंत पाणीसाठा १८१.७८० दलघमी (७५.०५ टक्के) आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. नदीकाठच्या गावांनी सावध राहावे, असे निम्न दुधना प्रकल्प, पूर नियंत्रण कक्षाने कळविले आहे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!