हेलसमध्ये रंगला ‘श्रीं’चा पालखी पोर्णिमा सोहळा 

हेलसमध्ये रंगला ‘श्रीं’चा पालखी पोर्णिमा सोहळा

हेलसमध्ये रंगला 'श्रीं'चा पालखी पोर्णिमा सोहळा 

श्री गणेश दर्शनासाठी शेकडो भाविकांची गर्दी; ९० गावांच्या दिंड्यांच्या सहभागाने भक्तिमय वातावरण

सेलू/परभणी : गणेशोत्सवानिमित्त हेलस (ता.मंठा) येथील ग्रामदैवत प्राचीन श्री गणेश मंदिराच्या वतीने बुधवारी, १८ सप्टेंबर रोजी आयोजित पारंपरिक ‘श्रीं’चा पालखी पोर्णिमा मिरवणूक सोहळा आठ तास चालला. ९० गावांच्या दिंड्यांच्या सहभागाने आणि हरिनामाच्या गजराने सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यानिमित्ताने पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी बुधवारी रात्री उशिरा पर्यंत दर्शनासाठी हेलसमध्ये गर्दी केली होती.

गणेशोत्सवाचे हे १३६ वे वर्ष होते. १२ ते १८ सप्टेंबर या कालावधीत श्रीमद् भागवत कथा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. काकड आरती, श्री ज्ञानेश्वरी पारायण व सकाळी अकरा ते चार या वेळेत योगेश महाराज कुलकर्णी मंठेकर यांनी भागवत कथा निरूपण केले. बुधवारी दुपारी चार वाजता महाआरती व पारंपरिक शिरा,भात, कढीचा महाप्रसाद झाला. रात्री आठ वाजता महाआरती झाल्यानंतर नऊ वाजता फुलांनी सजविलेल्या पालखीतून ‘श्रीं’ च्या मिरवणूक सोहळ्याला सुरुवात झाली. यानिमित्ताने श्री गणेश मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. पालखी मार्गावर दारोदारी रांगोळी घालण्यात आल्या होत्या. महिला तसेच पुरूषांनी ‘श्रीं’चे पूजन करून काणगी प्रसाद घेतला. गुरुवारी (१९ सप्टेंबर) पहाटे पाच पर्यंत पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात रंगला. पंचक्रोशीतील ९० गावांच्या दिंडीतील भजनी मंडळांनी वैशिष्ट्य पूर्ण वेशभूषेत गवळण, भारूड, अभंग, भजने सादर करून रंगत आणली. सकाळी सहा वाजता हरिपाठ, महाआरती, दहीहंडी व अल्पोपहार प्रसादाने सोहळ्याची सांगता झाली. यशस्वीतेसाठी श्री गणेश मंदिर संस्थानचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

तरूणांनी जपली नाट्य परंपरा : नाट्य सादरीकरणाद्वारे समाजप्रबोधनाची १३६ वर्षांची परंपरा श्री गणेश नाट्य मंडळाच्या जेष्ठ कलावंतासह तरूणांनी या वर्षीही जपली. या वर्षी १४ ते १६ सप्टेंबर कालावधीत माझ्या सासरच्या मंदिरी, लावणीत भडकला अंगार आणि सरपंच खूनी पाटील बेइमानी या नाटकांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!