विविध योजनांव्दारे विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी : तहसीलदार डॉ.शिवाजी मगर

विविध योजनांव्दारे विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी : तहसीलदार डॉ.शिवाजी मगर

सेलूमध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा जनजागृती मेळावा उत्साहात, योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सेलू/परभणी : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील नागरिकांना जिवनमान उंचावण्यास मदत होत आहे; तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासासोबतच करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेलूचे तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांनी शुक्रवारी, २० सप्टेंबररोजी केले.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांची जनजागृती मोहीम सहाय्यक संचालक गीता गुठ्ठे यांच्या सनियंत्रणात परभणी जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावर राबविली जात आहे. या अंतर्गत सेलू येथील नूतन महाविद्यालय सभागृहात शुक्रवारी जनजागृती मेळावा झाला. या वेळी अध्यक्षीय भाषणात तहसीलदार डॉ.शिवाजी मगर बोलत होते. याप्रंसगी गटविकास अधिकारी अमितकुमार मुंडे, प्राचार्य डॉ.उत्तम राठोड, निरीक्षक तुकाराम भराड, ओबीसी महामंडळचे निरीक्षक रवी दशरथे, गणेश जाधव, गंगाधर भुसारे, रमेश मरेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.मगर म्हणाले,” इतर मागास प्रवर्गातील विविध घटकांसाठी सरकारने स्वतंत्र विभाग कार्यान्वित केला आहे. यामध्ये मॅट्रीकपूर्वपासून मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसह परदेशात मोफत शिक्षणाची विद्यार्थ्यांना संधी आहे.” विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री.मुंडे यांनी केले. श्री.दशरथे आणि श्री.भुसारे यांनी इतर मागासवर्गीयांसाठीच्या विविध योजनांचे स्वरूप व निकषांबद्दल सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन रेवणअप्पा साळेगावकर यांनी केले. भगवान पल्लेवाड यांनी आभार मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य रमेश नखाते, मुख्याध्यापक शाम मचाले, नीलेश गडम, योगेश गिराम, भगवान पल्लेवाड, बालाजी मुळे, बाळू गोरे, भागवत चोपडे यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!