मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2 : श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू तालुक्यातून द्वितीय

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2 : श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू तालुक्यातून द्वितीय

सेलू : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा- टप्पा 2 मध्ये येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाने खाजगी संस्था गटातून तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत शैक्षणिक दर्जा, सोयीसुविधा, भौतिक सुविधा, उपस्थिती, शिक्षकांची गुणात्मक वाढ, सामाजिक सहभाग, तंत्रज्ञान समृद्ध अध्यापन, पर्यावरणीय स्थिरता हे या स्पर्धेसाठी मुख्य निकष होते.

यासाठी तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या 112 तर खाजगी संस्थेच्या 62 शाळा सहभागी झाल्या होत्या. श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाने प्रथमच विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब हळणे यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी या स्पर्धेत सहभाग घेऊन मोठे यश संपादन केले आहे. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेल्या अथक परिश्रमाचे हे फलित आहे असे प्रतिपादन सचिव महेश खारकर यांनी केले. तर ज्येष्ठ शिक्षक संजय धारासुरकर, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक योगेश ढवारे व सहकारी शिक्षक कृष्णा पांचाळ, शुभांगी भाग्यवंत व प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व सहकारी शिक्षक यांची साथ व सहकार्य यामुळेच हे यश मिळाले असल्याचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बालासाहेब हळणे यांनी सांगितले. या यशाबद्दल उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, सेलूचे गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, केंद्र प्रमुख एकनाथ जाधव, के.बा.शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिरुध्द जोशी, उपाध्यक्ष डॉ.सुनील कुलकर्णी, सचिव महेश खारकर, सहसचिव अभय सुभेदार, कोषाध्यक्ष ललित बिनायके, सदस्य जयंत दिग्रसकर, डॉ.प्रवीण जोग, प्रवीण माणकेश्वर, विष्णू शेरे, ॲड. किशोर जवळेकर, रामेश्वर राठी, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!