गणेश माळवे यांना राज्यस्तरीय क्रीडा रत्न गौरव पुरस्कार 

गणेश माळवे यांना राज्यस्तरीय क्रीडा रत्न गौरव पुरस्कार 

सेलू/परभणी : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि.ट्रस्ट) यांच्या वतीने शुक्रवारी, २० सप्टेंबर रोजी सेलू येथील नूतन विद्यालयातील क्रीडा शिक्षक गणेश शेषराव माळवे यांना राज्यस्तरीय क्रीडा रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

“राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन २०२४” या उपक्रमात समारंभपूर्वक श्री गणेश माळवे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या बद्दल श्री माळवे यांचा शनिवारी नूतन विद्यालयात सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे, पी.टी.कपाटे आदींसह शिक्षकांची उपस्थिती होती.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!