श्रीजयभवानी नवरात्र महोत्सव : सेलूतील श्री संत गोविंद बाबा चौकात मंडप भूमिपूजन उत्साहात
सेलू : सेलू् येथील श्री संत गोविंद बाबा चौकातील श्री जयभवानी नवरात्र महोत्सवाचे यंदा ४१ वे वर्ष आहे. उत्सवाच्या निमित्ताने मंडप भूमिपूजनाचे शनिवारी, २१ सप्टेंबर रोजी धनंजयसिंह बायस ठाकूर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
मंडळाची स्थापना संस्थापक स्व.प्रकाशसिंह भैया ठाकूर यांनी १९८४ मध्ये केली होती. तेव्हांपासून अखंडित पारंपरिक नवरात्र महोत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. यंदाही मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे नागेश ठाकूर यांनी सांगितले. या वेळी गणेशसिंह ठाकुर, रूपाली ठाकूर, मनीषा बायस, संध्या ठाकूर, अशोक शेलार, इंद्रजीत ठाकूर, आदित्य कुलथे, रितेश शेडुते, शक्ती बोराडे, विशू ठाकूर, संतोष नोकवाल, ओम गायकवाड, जतीन काकडे, शक्ती पवार, अर्जुन ठाकूर आदी उपस्थित होते.