‘सुंदर शाळा’ अभियानात सेलूतील रोडगे प्रिन्स इंग्लिश शाळा प्रथम

‘सुंदर शाळा’ अभियानात सेलूतील रोडगे प्रिन्स इंग्लिश शाळा प्रथम

परभणी जिल्ह्यात पटकाविले द्वितीय पारितोषिक

सेलू : माझी शाळा सुंदर शाळा” टप्पा दोन अभियानात सेलू (जि. परभणी) येथील श्रीराम प्रतिष्ठान सेलू संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. शाळेने सेलू तालुक्यात खासगी शाळा गटात प्रथम, तर जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. या अभियानाचा उद्देश शाळांचे सौंदर्यीकरण, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्मिती करण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे हा आहे. यामध्ये रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलने यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शाळा परिसरात हरित क्षेत्र वाढवणे, स्वच्छता मोहीम राबवणे आणि शाळेच्या इमारतीची सुधारणा यासारख्या गोष्टींवर भर दिला. शाळेच्या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे आदींसह व्यवस्थापन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!