तिरूपती बालाजी प्रसादातील भेसळप्रकरणी कारवाईची मागणी
सेलूच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
सेलू,जि.परभणी : तिरुमला तिरुपती बालाजीच्या लाडू प्रसादात जनावराची चरबी व इतर भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सेलू उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नायब तहसीलदार कृष्णा देशमुख यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी जयसिंग शेळके, व्यंकटेश काबरा, अविनाश बिहाणी, रामेश्वर गाडेकर, भारत इंद्रोके, अनुप कान्हेकर, विष्णू काष्टे, माणिक शेळके, मोहन गाडेकर, राजन पवार, दिपक लाटे आदींची उपस्थिती होती.