जिप शिक्षक पतपेढी सभेच्या चौकशीची मागणी
सेलूतील सहाय्यक निबंधक यांना निवेदन
सेलू : येथील जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा बऱ्याच सभासदांना अंधारात ठेऊन २२ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात आली. या वार्षिक सर्वसाधारण सभेची संपूर्ण चौकशी करून घेतलेली सभा व त्यातील निर्णय रद्द करण्याची मागणी तालुक्यातील सभासदांच्या वतीने सभासद रामा भीमराव गायकवाड यांनी २६ सप्टेंबर रोजी सहाय्यक निबंधक सेलू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व वार्षिक अहवाल संस्थेच्या वतीने सर्व सभासदांना देणे बंधनकारक असूनही अनेक सभासदांना या सभेची सूचना व वार्षिक अहवाल मिळालेले नाहीत. त्यामुळे अनेक सभासदांना माहितीच नसल्याने या सभेस उपस्थित राहू शकले नाहीत. हे सभासदांच्या हक्क व अधिकारांवर गदा आणणारे आहे. म्हणून सहकार कायदा व नियम धाब्यावर बसवून घेतलेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेची संपूर्ण चौकशी करून घेतलेली सभा व त्यातील निर्णय रद्द करण्याची मागणी तालुक्यातील सभासदांच्या वतीने सभासद रामा भीमराव गायकवाड यांनी २६ सप्टेंबर रोजी सहाय्यक निबंधक सेलू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.