इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाला मोठी गर्दी

इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाला मोठी गर्दी

सेलू तालुक्यातील कीर्तनकारांचा भव्य सत्कार, माजी आमदार विजय भांबळे यांचा पुढाकार

इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाला मोठी गर्दी

सेलू  : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व माजी आमदार विजय भांबळे यांच्या पुढाराने सेलू येथे आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध विनोदी कीर्तनकारनिवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे कीर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तसेच या कार्यक्रमात सेलू तालुक्यातील अनेक कीर्तनकार व संत मंडळींचे संतपूजन व सत्कार समारंभ पार पडला. हरिनामाच्या जयघोषात कार्यक्रम संपन्न झाला.

सेलू तालुक्यात अनेक भागात वारकरी संप्रदायाचे कार्य उल्लेखनीय आहे. कीर्तनाचा माध्यमातून समाजप्रबोधन करण्यासाठी वारकरी संप्रदाय खूप महत्वाचा आहे. वारकरी मंडळीच्या प्रत्येक कार्यात मोठ्या आनंदाने सहभागी होऊन प्रत्येक कार्यात अग्रेसर राहील, असे मनोगत माजी आमदार भांबळे साहेबांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास सेलू शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!