अमर शहीद भगत सिंग जयंती : प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये गुणवंतांचा सन्मान

अमर शहीद भगत सिंग जयंती : प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये गुणवंतांचा सन्मान

सेलू : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये शनिवारी, २८ सप्टेंबर रोजी अमर शहीद भगत सिंग जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने प्रेसिडेन्शिअल परीक्षेतील गुणवंतांचा ऑरेंज व यल्लो कॅपने सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे होते. प्राचार्या प्रगती क्षीरसागर, पालक, मान्यवर उपस्थित होते. या या वेळी पालकांनी मनोगत व्यक्त करतांना नावीन्यपूर्ण उपक्रमातून गुणवंत विद्यार्थी घडवतात म्हणून अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांचे आभार मानले

डॉ.संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांना अमर शहीद भगतसिंग यांच्या विषयी माहिती देऊन यशस्वी जीवनासाठी मार्गदर्शन केले. यामध्ये शाळेतून असे छोटे छोटे टारगेट मुलांना देऊन त्यांच्यामध्ये गुणवत्ता वाढवण्याचे प्रयत्न केले जाते. यातूनच त्यांना अभ्यासाची आवड निर्माण होते. वर्ग १ ला (अ) आवटे प्रगती, डोके अनवीता, ( ब ) येवले समर्थ, कांबळे आयुषी, वर्ग २ रा चाटे गौरव, आघाव साईराज, वर्ग ३ रा शिंदे हर्षद, फंड क्षीतिज, वर्ग ४ था साबळे श्रेयस, बरसाले स्वरा, वर्ग ५ वा खंदारे शितल, असद सय्यद वर्ग ६ वा राऊत बालाजी, शेवाळे प्रज्वल, वर्ग ७ वा टेंबरे रिया, मोगल सौरभ, वर्ग ८ वा शिंदे कार्तिक, चव्हाण ऋतुराज, वर्ग ९ वा काकडे विठ्ठल, गरड श्रवण, वर्ग १० वा चव्हाण अक्षरा, पवार आयुष या विद्यार्थ्यांना ऑरेंज कॅप व येलो कॅप मिळाले आहे. सूत्रसंचालन सारिका ताठे यांनी केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!