रेखाकला परीक्षेला ३१७ विद्यार्थी उपस्थित 

रेखाकला परीक्षेला ३१७ विद्यार्थी उपस्थित 

आहेर बोरगावच्या नितीन विद्यालय केंद्राच्या मान्यतेने सोय

रेखाकला परीक्षेला ३१७ विद्यार्थी उपस्थित 

सेलू/परभणी : कला शिक्षण मंडळाच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड शासकीय रेखाकला परीक्षेसाठी घेण्यासाठी सेलू तालुक्यातील आहेर बोरगावच्या नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर्षी पासून मान्यता मिळाली. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची रेखाकला परीक्षेची सोय झाली आहे. या वर्षी दोन्ही परीक्षांना या केंद्रात १५ शाळांतील ३१७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

सेलू तालुक्यात नूतन विद्यालय हे एकमेव परीक्षा केंद्र उपलब्ध होते. या परीक्षा केंद्राकडे पूर्ण तालुक्याला सामावून घेण्याची क्षमता नसल्याने विद्यार्थ्यांना जिंतूर किंवा पाथरी येथील परीक्षा केंद्रावर जावे लागत असे. यामुळे विद्यार्थ्यांची खूप मोठी गैरसोय होत होती. तालुक्यातील सर्व कला शिक्षकांच्या प्रयत्नाने आहेर बोरगावच्या नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शासकीय रेखाकला परीक्षा केंद्राला मान्यता मिळाली. पहिल्याच वर्षी १५ शाळेतील ३१७ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले. या परीक्षा केंद्राला माजी मुख्याध्यापक चंद्रशेखर नवाडे, दत्तात्रेय नागरे, नागेश देशपांडे, लक्ष्मण केदासे, केशव टाकळकर, पत्रकार राम सोनवणे, विलास शिंदे, मुंजाभाऊ बनसोडे यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी सहभागी परीक्षार्थींना सेलू नागरी सहकारी व नितीन माध्यमिक विद्यालयाच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक तथा परीक्षा केंद्रसंचालक सर्जेराव लहाने, सहकेंद्र संचालक संतोष ताल्डे, संचालक मुकुंद लहाने यांची उपस्थिती होती. या परीक्षेसाठी सेलू येथील के.बा.विद्यालय, शारदा विद्यालय, न्यू हायस्कूल, यशवंत विद्यालय, विवेकानंद विद्यालय, ज्ञानतीर्थ विद्यालय, यासेर उर्दू हायस्कूल, मॉडर्न इंग्लिश स्कूल, प्राॅस्परस इंग्लिश स्कूल, प्रिन्स इंग्लिश स्कूल, व्हिजन इंग्लिश स्कूल, ज्ञानोदय माध्यमिक विद्यालय शिंदे टाकळी, जिल्हा परिषद शाळा देऊळगाव गात, जिल्हा परिषद शाळा गुगळी धामणगाव व नितीन माध्यमिक विद्यालय आहेर बोरगाव या शाळेतील विद्यार्थी सहभागी आहेत. परीक्षा यशस्वीतेसाठी कलाशिक्षक सुनील मोरे, चव्हाण, बोरकर यांच्यासह नितीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्न करत आहेत.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!